ऐतिहासिक लढा! विलास रूपवते यांच्या आंदोलनामुळे गुगलला झुकवून 'डूडल'वर झळकले डॉ. बाबासाहेब आंबेडकर; गुगलने पाठवलेला ई-मेल पुरावा!
गुगलच्या मुख्य मुख्यालयाने घेतली विलासभाऊ रूपवते यांच्या आंदोलनाची अधिकृत दखल! २०१४ मधील बीकेसी कार्यालयावरील धडक, गुगलचे संचालक मंडळ व पोलीस बैठक आणि गुगल हेड गीतांजली दुग्गल यांच्या अधिकृत ई-मेल आश्वासनानंतर १४ एप्रिल २०१५ रोजी गुगलच्या होमपेजवर झळकले महामानवाचे डूडल; ऐतिहासिक ई-मेल पुराव्यासह सविस्तर लेख.
महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विलासभाऊ रूपवते यांच्या सामाजिक व आक्रमक चळवळीची दखल थेट अमेरिकेतील कॅलिफोर्निया (Mountain View, California) येथील गुगलच्या जागतिक मुख्य मुख्यालयाने (Google Headquarters) अधिकृतपणे घेतली आहे.
ज्या गुगलने १४ एप्रिल २०१५ रोजी आपल्या अधिकृत होमपेजवर जागतिक 'गुगल डूडल' (Google Doodle) म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा झळकवून संपूर्ण जगाला महामानवाच्या विचारांची आणि कार्याची ओळख करून दिली, त्याच जागतिक व्यासपीठावर विलासभाऊंच्या नेतृत्वाची व लढ्याची नोंद होणे ही समस्त आंबेडकरी चळवळीसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. वंचित, निराधार आणि देवदासी महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी उभारलेला हा अभूतपूर्व लढा आणि हा सुवर्ण इतिहास समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलाच पाहिजे!
ऐतिहासिक संघर्ष! विलास रूपवते यांच्या आंदोलनामुळे गुगलला झुकवून 'डूडल'वर झळकले डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जागतिक पातळीवर कोणत्याही हक्कासाठी किंवा सन्मानासाठी तीव्र संघर्षाशिवाय पर्याय नसतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र गुगलच्या होमपेजवर 'डूडल' (Google Doodle) म्हणून झळकावे, यासाठी महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलासभाऊ रूपवते यांनी दिलेल्या ऐतिहासिक लढा आणि तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे अखेर जागतिक महासत्ता असलेल्या 'गुगल' (Google) कंपनीला नमते घ्यावे लागले होते.
त्यांच्या या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक योगदानामुळेच २०१५ मध्ये बाबासाहेबांचे डूडल जगभर प्रसिद्ध झाले, ज्याची परिणती २०१६ मधील ऐतिहासिक १२५ व्या जागतिक आंबेडकर जयंती साजरी होण्यात झाली.
काय घडला होता इतिहास?
२०१४ मध्ये विलास रूपवते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुगलने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी म्हणजेच १४ एप्रिल रोजी त्यांच्या सन्मानार्थ डूडल बनवावे, अशी अधिकृत मागणी केली होती. यासाठी थेट गुगल इंडियाच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मुख्य कार्यालयावर धडक देऊन अधिकृत निवेदन सादर करण्यात आले होते.
या निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला होता की, "जर १४ एप्रिल रोजी गुगलच्या भारताच्या होमपेजवर बाबासाहेबांचे चित्र सन्मानाने दाखवले गेले नाही, तर गुगलच्या भारतातील सर्व कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." या इशाऱ्याची प्रशासनाने आणि गुगलने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. २ एप्रिल २०१४ रोजी बी.के.सी. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि गुगलच्या संचालक मंडळाची (Board of Directors) एक महत्त्वाची तातडीची बैठक पार पडली होती.
गुगलच्या अमेरिका कार्यालयाकडून दखल आणि अधिकृत ई-मेल पुरावा
विलास रूपवते यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचा धसका गुगलच्या मुख्य अमेरिका कार्यालयानेही घेतला. गुगलच्या हेड गीतांजली दुग्गल (Gitanjli Duggal, Google) यांनी थेट विलास रूपवते यांना अधिकृत ई-मेल पाठवून संवाद साधला.
डूडल तयार करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागत असल्यामुळे २०१४ मध्ये तातडीने हे करणे शक्य नसले, तरी या मागणीचा योग्य सन्मान केला जाईल, असे अधिकृत आश्वासन गुगलकडून देण्यात आले. विलासभाऊंनी त्यावर गुगलला उत्तर देताना सांगितले होते की, "आमच्याकडे ग्राफिक डिझायनर्स आहेत, आम्ही हवे असल्यास डूडलची डिझाईनही उपलब्ध करून देतो."
ऐतिहासिक पुरावा : गुगल हेड गीतांजली दुग्गल यांनी विलासभाऊ रूपवते (vilasraorupawate@gmail.com) यांना पाठवलेला अधिकृत ई-मेल संवाद
गुगलकडून पाठवण्यात आलेल्या मूळ इंग्रजी ई-मेलचा सारांश :
"Dear Shri Rupawate,
We had forwarded your request for a doodle to mark the birth anniversary of Shri Babasaheb Ambedkar on April 14th by creating a Doodle on the Google home page, to the relevant technical team. However, we are informed that the process of creating a doodle requires significant engineering effort for which at least a few weeks' time is required... I will be happy to further discuss this matter with you.
With regards, Gitanjli"
अन् १२५ व्या जागतिक जयंतीचा मार्ग सुकर झाला...
अखेर या अभूतपूर्व संघर्षाला मोठे यश आले. १४ एप्रिल २०१५ रोजी गुगलने आपल्या अधिकृत होमपेजवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे डूडल ठेवून विलास रूपवते यांच्या मागणीचा आणि जगभरातील कोट्यवधी अनुयायांच्या भावनेचा सर्वोच्च गौरव केला.
भारतीय प्रसारमाध्यमांनी गुगलने बाबासाहेबांचा सन्मान केल्याची बातमी मोठ्या प्रमाणावर दाखवली. मात्र, या जागतिक सन्मानाच्या मागे विलास रूपवते आणि त्यांच्या निष्ठावंत सहकाऱ्यांचा — अनिल मोरे, कैलास केदारे, संदिप शार्दुल, प्रितम नाईक, सचिन सकट, विक्की पांडे — यांचा प्रचंड त्याग व संघर्ष होता.
या डूडलमुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व प्रतिमा जागतिक स्तरावर अधिक वेगाने पोहोचली आणि २०१६ मध्ये जगभरात बाबासाहेबांची १२५ वी जयंती अत्यंत अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली.
"या जगात न मागता काहीच मिळत नाही, त्यासाठी लढा द्यावा लागतो!" हाच अजरामर संदेश विलासभाऊ रूपवते यांच्या या ऐतिहासिक कामाने संपूर्ण देशातील आंबेडकरवादी चळवळीला आणि भावी पिढीला दिला आहे.
श्री. विलासभाऊ रूपवते
संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटना
What's Your Reaction?