मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कार्यालयात निराधार महिलांचा धडक मोर्चा व निदर्शने

निराधार महिला संघटनेच्या वतीने विलास रूपवते यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या दालनात घुसून घोषणाबाजी करत बीपीएल शिधापत्रिका देण्याची ठाम मागणी करण्यात आली.

Oct 27, 2026 - 20:19
 0  4
मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कार्यालयात निराधार महिलांचा धडक मोर्चा व निदर्शने

मुंबई : दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना पिवळे रेशनकार्ड आणि उपेक्षित महिलांना दरमहा पेन्शन देण्याच्या मागणीसाठी विलास रूपवते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्रालयात थेट धडक दिली.

शासनाकडून वेळोवेळी आश्वासने देऊनही अंमलबजावणी न झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो देवदासी, परित्यक्ता आणि विधवा महिलांनी मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरील मंत्र्यांच्या दालनात प्रवेश करून जोरदार निदर्शने केली. विलास रूपवते यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत शासन वंचित घटकांच्या मागण्यांची पूर्तता करत नाही, तोपर्यंत हा लढा राज्यभर अविरतपणे सुरू राहील.

मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कार्यालयात निराधार महिलांचा धडक मोर्चा व निदर्शने

वृत्तपत्र संदर्भ : नवभारत (२३ फेब्रुवारी २०१०)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow