नागपूर अधिवेशनावर देवदासी व निराधार महिलांची ऐतिहासिक धडक: मोहिनी कॉम्प्लेक्स परिसरात तीव्र निदर्शने

नागपूर रेल्वे स्थानकापासून सुरू झालेला मोर्चा मोहिनी कॉम्प्लेक्स येथे पोलिसांनी अडवला असता महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

Oct 27, 2026 - 20:19
 0  0
नागपूर अधिवेशनावर देवदासी व निराधार महिलांची ऐतिहासिक धडक: मोहिनी कॉम्प्लेक्स परिसरात तीव्र निदर्शने

नागपूर : विलासभाऊ रूपवते प्रतिष्ठानप्रणित महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आलेल्या ऐतिहासिक मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो महिलांनी सहभाग नोंदवला.

मोर्चा नागपूर रेल्वे स्थानकापासून सुरू होऊन मोहिनी कॉम्प्लेक्स येथे धडकला. महिलांच्या प्रचंड घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला. विलास रूपवते यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांच्या मानधनात वाढ होईपर्यंत आणि रेशनकार्डाचा हक्क मिळेपर्यंत ही चळवळ मागे हटणार नाही.

नागपूर अधिवेशनावर देवदासी व निराधार महिलांची ऐतिहासिक धडक: मोहिनी कॉम्प्लेक्स परिसरात तीव्र निदर्शने

वृत्तपत्र संदर्भ : बहुजनरत्न लोकनायक (२७ डिसेंबर २००९)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow