पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात वरळी येथे विलासभाऊ रूपवते यांचे आक्रमक रस्ता रोको आंदोलन

पेट्रोल आणि डिझेलच्या भरमसाठ दरवाढीमुळे महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी विलासभाऊ रूपवते यांनी वरळी येथे थेट रस्त्यावर झोपून रस्ता रोको आंदोलन केले.

Oct 27, 2026 - 20:45
 0  1
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात वरळी येथे विलासभाऊ रूपवते यांचे आक्रमक रस्ता रोको आंदोलन

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे महागाई गगनाला भिडली असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीच्या विरोधात विलासभाऊ रूपवते यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील वरळी नाका येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान विलासभाऊ रूपवते आणि कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर आडवे पडून वाहने रोखून धरली. पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता तीव्र झटापट झाली. पोलिसांनी अखेर विलासभाऊंना पोलीस व्हॅनमध्ये घालून ताब्यात घेतले.

सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालणाऱ्या धोरणांविरोधात हे आंदोलन असून दरवाढ मागे घेईपर्यंत संघर्ष सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात वरळी येथे विलासभाऊ रूपवते यांचे आक्रमक रस्ता रोको आंदोलन

ऐतिहासिक संदर्भ : आंदोलन वृत्त (२०१४)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow