संतप्त देवदासी महिलांकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या दालनाची तोडफोड
मंत्रालयातील अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयात घुसून देवदासी, निराधार (विधवा), अपंग आणि घरकाम करणाऱ्या महिलांनी बीपीएल पिवळे रेशनकार्ड व मानधनाच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन केले.
मुंबई : मंत्रालयातील अन्न व नागरी पुरवठामंत्री यांच्या कार्यालयात घुसून देवदासी, निराधार (विधवा), अपंग आणि घरकाम करणाऱ्या महिलांनी बीपीएल पिवळे रेशनकार्ड मिळवण्यासाठी आणि संजय गांधी निराधार योजनेच्या जाचक अटी दूर करण्यासाठी आक्रमक आंदोलन छेडले.
मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात शेकडो महिलांनी प्रवेश करून ठिय्या मांडला व आपल्या हक्कांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटनेचे संस्थापक विलास रूपवते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. अनेक वर्षांपासून वंचित राहिलेल्या घटकांना न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाला तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आले.
या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून कागदपत्रे व फाइल्स फेकून प्रशासनाच्या उदासीनतेचा तीव्र निषेध नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेतले.

वृत्तपत्र संदर्भ : वृत्तरत्न सम्राट (२२ फेब्रुवारी २०१०)
What's Your Reaction?