रस्त्यासाठी अधिकार्यांसोबत बैठक
Ghatkopar residents met officials demanding preservation of Gurukrupa Housing Society road, seeking urgent action.
घाटकोपर : पूर्वेकडील पंतनगर भागातील गेल्या अनेक वर्षांपासून वहिवाट असलेला गुरुकृपा हाउसिंग सोसायटीलगतचा रस्ता वाचवावा, अशा मागणीचे निवेदन रझा झंझरी यांनी पुनर्विकास प्राधिकरणाच्या अधिकार्यांसोबत शुक्रवारी घाटकोपर येथील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत केले. या बैठकीस पंतनगर विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, अभियंता विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
अशा आरोप करून न्यायालयात मोर्चा काढण्याच्या इशारा स्वरूपात निवेदन दिले होते. मात्र, पोलीस आणि प्राधिकरणाचे अधिकार्यांच्या हस्ते शुक्रवारी प्राधिकरण कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीत गुरुकृपा हाउसिंग सोसायटीचे महिला व पुरुष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी महाराष्ट्र निःशक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास रूपवते यांच्यासह राजू खाडे, जीवन भारतराव, संजय नाईक व महिला पदाधिकारी यांनीही हजेरी लावली. बैठकीसाठी प्राधिकरणाचे अधिकारी मंजर, पाटील, तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
बैठकीचे संयोजन गुरुकृपा हाउसिंग सोसायटी सदस्य गणेश माळे यांनी केले. बैठकीत रस्ता वाचवण्यासाठी मार्ग काढण्याचे आश्वासन अधिकार्यांनी दिले.
Ghatkopar: The road adjacent to Gurukrupa Housing Society in Pantnagar, which has been used as a thoroughfare for many years, should be preserved. With this demand, Raza Zanzari submitted a memorandum during a meeting held on Friday at the Ghatkopar office of the redevelopment authority. Present at the meeting were Pantnagar Police Inspector Hemant Patil, officers from the engineering department, and other police officials.
The memorandum was submitted as a warning that a march would be taken to court if the demand was ignored. However, a meeting was held on Friday at the authority’s office with police and redevelopment officials. A large number of men and women members of Gurukrupa Housing Society were present at the meeting.
Also present were Vilas Rupawate, President of Maharashtra Disabled Service Board, along with Raju Khade, Jeevan Bharatrao, Sanjay Naik, and women representatives. Officials from the redevelopment authority including Manjar and Patil, as well as police officials, were also in attendance.
The meeting was coordinated by Ganesh Male, a member of Gurukrupa Housing Society. Officials assured that a solution would be found to save the road.
What's Your Reaction?