मंत्रालयावर देवदासी महिलांचे हक्कांसाठी ऐतिहासिक आंदोलन : राष्ट्रीय पातळीवर दखल
मुंबईत मंत्रालयासमोर देवदासी व निराधार महिलांनी केलेल्या बांगड्या भराव आंदोलनाची दखल राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी घेतली. उपेक्षित महिलांच्या या आंदोलनाने संपूर्ण प्रशासनाला हादरवून सोडले.
मुंबई मंत्रालयासमोर महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या ऐतिहासिक आंदोलनाची दखल राष्ट्रीय वृत्तपत्रांनी घेतली. तेलगू वृत्तपत्र 'साक्षी'ने पहिल्या पानावर या आंदोलनाचे छायाचित्र प्रसिद्ध करून दुर्बल घटकांच्या लढ्याला प्रसिद्धी दिली.
देवदासी महिलांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि उपजीविकेच्या साधनांसाठी थेट मंत्रालयाच्या दारात आंदोलन करत शासनाला बांगड्यांचा नजराणा सादर केला होता. सामाजिक नेते विलास रूपवते यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने प्रशासनाचे डोळे उघडण्याचे काम केले.
या ऐतिहासिक आंदोलनामुळे शासनाला दुर्बल घटकांच्या मागण्यांवर तातडीने बैठक बोलावणे भाग पडले.

ऐतिहासिक संदर्भ : दैनिक साक्षी (Sakshi Telugu Daily) (६ एप्रिल २०१०)
What's Your Reaction?