देवदासी व निराधार महिलांचा नागपूर विधिमंडळावर प्रचंड मोर्चा: विलास रूपवते यांचा तीव्र लढा
नागपूर हिवाळी अधिवेशनावर महिलांच्या विविध मागण्यांसाठी निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी अडवणूक केली असता हजारो महिलांनी परिसर दणाणून सोडला व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळवले.
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकापासून विधानभवनाकडे निघालेल्या हजारो देवदासी व निराधार महिलांच्या मोर्चाला पोलिसांनी मोहिनी कॉम्प्लेक्स येथे रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक महिलांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.
शिष्टमंडळाने निवेदन सादर करताना मंत्र्यांकडून विलास रूपवते यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने मोर्चा अत्यंत आक्रमक झाला. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तात्काळ चर्चेची तयारी दर्शवली आणि मागण्या पूर्ण करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

वृत्तपत्र संदर्भ : दैनिक सर्वजन (२५ डिसेंबर २००९)
What's Your Reaction?