देवदासी महिलांचे मंत्रालयावर बांगड्या भरा आंदोलन : विलास रूपवते यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
उपेक्षित महिलांच्या प्रश्नांकडे सरकारने कायम दुर्लक्ष केल्याने संतप्त महिला थेट मंत्रालयावर धडकल्या. विलास रूपवते यांनी महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवत सरकारला इशारा दिला.
देवदासी, निराधार आणि घरकाम करणाऱ्या उपेक्षित महिलांच्या प्रश्नांकडे राज्य शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने संतप्त महिला थेट मंत्रालयावर धडकल्या. दरवाजा क्रमांक ३ जवळ साडी व बांगड्यांची भेट देण्याचा प्रयत्न करताना अचानक सुरू झालेल्या आंदोलनाने पोलिसांची तारांबळ उडाली.
निराधार (विधवा), देवदासी, अंध-अपंग महिलांना दरमहा २ हजार रुपये पेन्शन मिळावी, पिवळी शिधापत्रिका मिळावी या मागण्यांसाठी महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलक महिलांची जामिनावर सुटका झाल्यानंतर सामाजिक नेते विलास रूपवते यांनी स्पष्ट केले की, महिलांवर गुन्हे दाखल करून शासनाला त्यांचा आवाज दाबता येणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल.

ऐतिहासिक संदर्भ : दैनिक प्रहार (६ एप्रिल २०१०)
What's Your Reaction?